काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करणा-या पोलिसांना निलंबीत कराः सचिन सावंत

मुंबई नगरी टीम

मुंबई  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य सोलापूर दौ-यावेळी युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिसांनी  आमानुषपणे मारहाण केली. ही अमानवीय व बेकायदेशीर कृती करणा-या पोलिसांचे तात्काळ निलंबन करून सर्व दोषींवर कारवाई अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वात आज राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले व दोषी अधिका-यांवर कारवाईची मागणी केली. ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचे सांगून काँग्रेस नेत्यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. काळ्या फिती लावून काँग्रेस शिष्टमंडळाने आपल्या तीव्र भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.पोलीस महासंचालकांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करून  विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना सदर प्रकाराची चौकशी करणायाचे आदेश दिल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसेच चौकशीचा अहवाल येताक्षणी दोषी अधिका-यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन काँग्रेस शिष्टमंडळाला दिले.

Previous articleराज्याला खड्ड्यात घालणारे भाजप-शिवसेना सरकार गाडून टाकाः चव्हाण
Next articleकितीही यात्रा काढा,  कॉंग्रेस-राष्ट्रवादी औषधालाही उरणार नाही