गिरीष बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : धनंजय मुंडे

मुंबई नगरी टीम

जळगाव : बीड जिल्ह्यातील बिभिषण माने या दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला पदाचा गैरवापर करत व कायद्याची पायमल्ली करत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी परवाना बहाल केला आहे. त्यांनी कर्तव्यात कसून आणि पदाचा गैरवापर केला असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील मुरंबी (अंबाजोगाई) येथील स्वस्त धान्य दुकानाच्या परवाना प्रकरणी निकाल देतांना,  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंत्री हे जनतेचे विश्‍वस्त आणि रक्षक असतात, बापट यांनी कर्तव्यात कसूर केला आहे, पदाचा गैरवापर केला आहे, असे ताशेरे ओढले आहेत.  बापट यांच्यावर उच्च न्यायालयाने यापूर्वीही अनेक प्रकरणात वारंवार ठपका ठेवला असल्याने त्यांना एक मिनीटही पदावर राहण्याचा नैतिकअधिकार राहिलेला नाही, त्यामुळे त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.लोकायुक्त, न्यायालय या संस्थांनी या सरकारमधील  अनेक मंत्र्यांना दोषी ठरवूनही त्यांना पाठीशी घालण्याचे काम सरकारने केल्याने त्यांच्या ढोंगी पारदर्शकतेचा पर्दाफाश झाला आहे असेही मुंडे म्हणाले.

Previous articleमहागाईमुळे पिशवीतून पैसे आणि खिशातून सामान आणावे लागेल : छगन भुजबळ
Next articleछोटा पेंग्विन खुश झाला असेल :  निलेश राणे