म्हणून मोदी जनतेला छळतायत: राज ठाकरे

मुंबई नगरी टीम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा आपल्या व्यंगचित्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून आता मोदी जनतेला छळत असल्याचा टोला ठाकरे यांनी आज प्रसिध्द केलेल्या व्यंगचित्रातून लगावला आहे.

राज ठाकरे यांनी आज ट्विटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधणाला आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते. या वक्तव्याचा आधार घेत राज ठाकरे यांनी आज व्यंगचित्र प्रसिध्द केले आहे. काँग्रेसने मला छळले, म्हणून मी जनतेला छळतो, असे या व्यंगचित्रात दर्शविण्यात आले आहे.

दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेसच्या काळात देशाची १० वर्षे वाया गेली अशी टीका करतानाच, भ्रष्टाचार करता यावा म्हणून अशक्त सरकार हवे असते, असा टोला लगावला होता. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने माझे पाय ओढण्याचे प्रयत्न झाले. वाटेल ते आरोप करुन माझा छळ करण्यात आला असे मोदी म्हणाले होते. या वक्तव्याचा समाचार राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्रून घेतला आहे.

Previous articleन्यायालयात भक्कम बाजु मांडण्यात सरकार अपयशी : अजित पवार
Next articleपाच वर्षांपूर्वीची भाषणे ऐका आणि प्रचारासाठी फिरून दाखवा : धनंजय मुंडे