हमे तुमसे प्यार कितना… ये हम नही जानते : खा. उदयनराजे भोसले

मुंबई नगरी टीम

सातारा :  आपल्या खुमासदार शैलीमुळे नेहमीच चर्चेत असेलेले साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यातील एका कार्यक्रमात चक्क गाण म्हणून आपल्या कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त केले आहे. हमे तुमसे प्यार कितना… ये हम नही जानते… हे गाण त्यांनी चक्क स्टेजवरुन म्हटल आणि त्यांच्या या वेगळ्या शैलीचे कार्यकर्त्यांनी तेवढ्याच आवेशात स्वागत केले.

 बेधकड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे मतदार संघाच्या दौ-यावर असतील तर सरळ बांधावर जावून सर्वसामान्य जनतेशी मातीवर बसून गप्पा मारतात तर कधी फटफटीवरून शहरात फेरफटका मारतात त्यांच्या या स्वभावामुळे ते सर्वसामान्य जनतेसह आपल्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. आज साता-यात झालेल्या एका कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी “हमे तुमसे प्यार कितना… ये हम नही जानते”… हे गाण म्हणून  कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त केले. जो पर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत मी तुमच्यासाठीच जगणार आणि  प्रेम करणार आहे.. माझ्यात कसलाही बदल होणार नाही, हे शपथ घेवून सांगतो,फक्त तुमच्यात बदल करु नका. काय कमवायच आणि काय गमवायचं? असे सांगत तुम्हाला माझ भाषण ऐकून तुम्ही कंटाळला आला असेल तर एक गाण म्हणू का असा थेट सवाल करताच कार्यकर्ते आणि उपस्थितांकडून गाण म्हणण्याची जोरदार मागणी झाली आणि खा. उदयनराजे भोसले गाण म्हणून कार्यकर्त्यांना खूष केले.

Previous articleराज ठाकरे यांना अजित पवारांची टाळी
Next articleराज्यात आजपासून आर्थिक मागासांना आरक्षण लागू