राज ठाकरे यांना अजित पवारांची टाळी

मुंबई नगरी टीम

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेला महाआघाडीत स्थान नसल्याचे स्पष्ट केल्यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टाळी दिली आहे.मतविभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांनी आमच्यासोबत यावे,असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. आता राज ठाकरे यास कसा प्रतिसाद देतात त्यावर पुढील राजकीय चित्र अवलंबून आहे.

अजित पवार यांनी मनसेला ही टाळीच दिली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हेही नाराज आहेत.त्यांच्याशी असलेले मतभेद दूर करणार असल्याचेही ते म्हणाले.शरद पवारांनी मनसेला स्थान नसल्याचे म्हटले असले तरीही मतविभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांना एकत्र येण्याचे अजित पवारांचे आवाहन भाजप शिवसेनेत संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे की काय, अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत.राज ठाकरे यांनी नेहमीच अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे आणि त्यांची नक्कलही केली आहे. पण आता मतविभाजन झाले तर सत्ता मिळवणे कठीण आहे याची जाणीव राष्ट्रवादीला झाली आहे. शिवाय काँग्रेसचा मनसेला ठाम विरोध आहे. या निमित्ताने काँग्रेसवर कुरघोडी करण्याची संधीही साधण्यासाठी खेळी असू शकते.छगन भुजबळ यांनी नुकतीच राज ठाकरे यांची  त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे मनसे राष्ट्रवादी आघाडी होणार का, या चर्चेला उधाण आले होते.

Previous articleरोहित पवार आणि सुजय विखे भेटीने नगरचा तिढा सुटला ?
Next articleहमे तुमसे प्यार कितना… ये हम नही जानते : खा. उदयनराजे भोसले