युती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल : अमित शहा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात शिवसेना भाजापा युती आगामी लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल असा ठाम दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.शिवसेनेच्या मदतीने देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अधिक मजबूत सरकार सत्तेत येईल असेही ते म्हणाले.

आज झालेल्या पत्रकार सेना नेते लीलाधर डाके, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, उद्धव ठाकरे  असे शिवसेनेचे नेते तर  राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, प्रांताध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व पियुष गोयल असे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले की हा क्षण आनंदाचा आहे. सेना व भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात असणारी  गोष्ट आज होते आहे. राज्यात व देशात एनडीएचे राज्य येईल. दोन्ही पक्षांनी सखोल विचार करून एकत्र येण्याचा निर्णय़ केला. भाजपाचे सर्वात जुने साथीदार अकाली दल व  शिवसेना आमच्या सोबत आहेत ही आनंदाची बाब आहे. सेने बरोबर जे काही नाराजी झाली होती ती आता या क्षणी दूर झाली आहे. खांद्याला खांदा लावून दीर्घ काळासाठी आम्ही एकत्र लढणार आहोत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात अधिक भक्कम एनडीएचे सरकार येणार असा विश्वास शहांनी व्यक्त केला.

Previous articleभाजप शिवसेनेला जनता घरी बसववणार
Next articleपराभवाच्या भीतीनेच सेना  भाजपची युती : नवाब मलिक