मुंबई नगरी टीम
मुंबई : एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजप आणि शिवसेना यांनी काल अखेर युती केली.त्यामुळे शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये आज अग्रलेखात काय असेल याची कमालीची उत्सुकता होती. मात्र शिवसेनेने धक्कातंत्र देत युतीचा विषय टाळला. आजचा अग्रलेख पुलवामा विषयावर आहे.
युतीचा विषय नसला तरी अगदीच शिवसेना मवाळ झाली असे वाटू नये म्हणून भाजपवर सौम्य टीका केली आहे. पाकिस्तानशी चर्चा करण्याचे वक्तव्य करणार्या नवज्योत सिद्धूला लक्ष्य केले आहे.नवज्योत हा बेलगाम बोलणारा माणूस आहे. पण हे प्रॉडक्ट भाजपचेच आहे.पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत असताना या महाशयाने पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे असे वक्तव्य केले. याबद्दल त्याची सोनी वाहिनीने हकालपट्टी केली.पण त्याच वेळी सैनिक मरत असतील तर मरू द्या.त्यांना त्याचा पगार मिळतो ना असे म्हणणारा नेपालसिंग भाजपचाच नेता आहे,या शब्दात भाजपला लक्ष्य केले आहे.त्याच्यावर मात्र कारवाई झालेली नाही असे म्हणत टीका केली आहे. शिवसेनेने युतीवर काही भाष्य न केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.