शिवसेनेवर नितेश राणेंचे ट्विट अस्त्र

मुंबई नगरी टीम

मुंबई : आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि भाजपाच्या युतीवर टीका केली आहे. काल या दोन पक्षा मधिल युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या युतीवर आ. नितेश राणेंनी ट्विट करत निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, माफ करा राजे… तुमच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना तुमचा इतिहास आणि त्या भगव्याचे महत्त्व कळलेच नाही.

आपल्याच रयतेला फसवून स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही. आ. नितेश राणेंनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. युतीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Previous articleशिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
Next articleकाल युती आज सामनाच्या अग्रलेखातून टीका