भाजप शिवसेनेने रासपला पाच जागा सोडाव्यात

भाजप शिवसेनेने रासपला पाच जागा सोडाव्यात

मुंबई नगरी टीम

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने भाजप शिवसेना युतीकडे पाच जागांची मागणी केली आहे.राष्ट्रीय समाज पक्षाने प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येत्या ५ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून,या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह  रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते हेही उपस्थित राहणार आहेत. धनगर समाजासोबतच मुस्लिम आरक्षणाचा अंतिम निर्णय या महामेळाव्यात घेण्यात येवून,आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाला पाच जागा द्याव्यात या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

Previous articleरिपब्लिकन पक्षासाठी दोन जागा सोडा : रामदास आठवले
Next articleठाणे लोकसभेची जागा मेरिटनुसार भाजपला द्या