भाजपसह १४  राजकीय पक्षांना  निवडणूक आयोगाची नोटीस

भाजपसह १४  राजकीय पक्षांना  निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त १४ राजकीय पक्षांना नोटीस बजावल्या असून १० मार्च २०१९ पर्यंत खर्चाचा तपशील सादर करावा, असे कळविण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.

सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या १५ ऑक्टोबर २०१६ च्या आदेशान्वये राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय पक्षांना वेळोवेळी अवगतही करण्यात आले होते. त्यामुळे आपली नोंदणी रदद् का करण्यात येऊ नये, अशी नोटीस आता बजावण्यात आली आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या राजकीय पक्षांनी नावे अशी: भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,  शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम, लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन आणि जनता दल (युनायटेड).

Previous articleमहाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही : मुख्यमंत्री
Next articleअकरावी प्रवेशासाठी इन-हाउस कोटा आता १० टक्के