मुख्यमंत्री महोदय, माढयाच्या विजयाचा पेढा तुम्हाला घरपोच वर्षावर मिळेल

मुख्यमंत्री महोदय, माढयाच्या विजयाचा पेढा तुम्हाला घरपोच वर्षावर मिळे

मुंबई नगरी टीम

मुंबई : राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची, झेलण्याची आणि परतून लावण्याची ताकद आणि धमक शरद पवार साहेबांमध्ये आहे. सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही. साहेब उमेदवार नसले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माढाही जिंकू व उर्वरित महाराष्ट्रही. आणि हो आमच्या विजयाचा पेढाही तुम्हाला घरपोच वर्षावर येऊन भरवू अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांनी घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची माघार म्हणजे युतीचा मोठा विजय आहे. राजकीय वारं ओळखून पवारांनी माघार घेतल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी युतीचा  ‘फुसका वारा’ म्हणत टीका केली.नाही तरी २३ मे नंतर देशातल्या निकालाने तुमचे तोंड कडू पडणार आहे त्यावेळी तुम्हाला तोंड गोड करायला पेढा लागणारच आहे असल्याचा टोला लगावतांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज आनंद व्यक्त करण्यापेक्षा माढयाच्या निवडणूक रिंगणात उतरावे असे आव्हानही मुंडे यांनी दिले.भाजपच्या मंडळीचा आजचा आनंद अल्पायुषी ठरेल असेही ते म्हणाले.

Previous articleमंत्रालयासमोर कर्जबाजारी तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Next articleशरद पवारांची माघार हा युतीचा विजय