जालन्याचा तिढा सुटला ; खोतकर यांची माघार
मुंबई नगरी टीम
जालना : शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटले होते. दानवे यांच्याविरूद्ध आपण निवडणूक लढवज,अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे दानवे तणावात होते. पण खोतकरांनी माघार घेतल्याने जालन्याचा तिढा अखेर सुटला आहे.
रावसाहेब दानवे येथून लोकसभा लढवणार आहेत,हे निश्चित आहे.खोतकरांना पुढील मंत्रिमंडळात कँबिनेट मंत्रिपद देण्याची शिवसेनेने ग्वाही दिल्याचे समजते.मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बैठकीत खोतकर-दानवे वाद मिटला.खोतकरांची समजूत काढण्यात यश आल्यानेरावसाहेब दानवे यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यावर अर्जुन खोतकर ठाम होते. याआधी दानवे आणि खोतकरांची भेट झाली. पण खोतकरांनी आपली भूमिका बदलली नव्हती.त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यानंतरही ते ठाम होते.आपण निवडणूक तयारीमध्ये खूप पुढे गेलो आहोत. त्यामुळे मैत्रिपूर्ण लढतीबाबत विचार व्हावा, अशी गळ त्यांनी पक्षनेतृत्वाला घातली होती. पण अखेर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर खोतकरांनी माघार घेतल्याची माहिती आता पुढे आली आहे.जा
लनामतदारसंघातील उमेदवारीच्या संदर्भात खासदार दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शिष्टाई केली होती. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर देशमुख यांनी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे सांगितले. पण दानवे आणि खोतकर हे आपआपल्या विधानावर ठाम होते.