पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी
मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपने काल रात्री उशीराने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. पुण्यातील लोकसभेच्या बहुचर्चित जागेवर मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपाने काल रात्री उशीराने एकूण ३६ उमेदवारांचा समावेश असलेली आपली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रामधील सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जळगाव मधून स्मिता वाघ, नांदेड येथून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी येथून डॉ. भारती पवार, पुण्यामधून गिरीश बापट, बारामती येथून कांचन राहुल कूल आणि सोलापूर येथून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ईशान्य मुंबईतील उमेदवार भाजपाने अद्यापही घोषित केलेला नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम वाढला आहे.