बजरंगबप्पांसाठी धनंजय मुंडेंचा परळीकरांसोबत  टॉक विथ मॉर्निंग वॉक

बजरंगबप्पांसाठी धनंजय मुंडेंचा परळीकरांसोबत  टॉक विथ मॉर्निंग वॉक

मुंबई नगरी टीम

परळी : आपल्या शारिरीक फिटनेस बद्दल अत्यंत जागरूक असलेल्या विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीतही आपल्या सकाळच्या दिनचर्यामध्ये कोणताही बदल न होऊ देता शारिरीक फिटनेस सांभाळतच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अगदी भल्या सकाळपासूनच प्रचार करण्यासाठी टॉक विथ मॉर्निंग वॉक अशी नामी क्लुप्ती साधली आहे.

मागील तीन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देत शारिरीक फिटनेस प्राप्त केला आहे. कितीही मोठी जवाबदारी आणि धावपळ असली तरी, सकाळचा नियमित ठरलेला मॉर्निंग वॉक किंवा संध्याकाळी चालणे त्यांना न सोडण्यामुळेच झालेले त्यांचे स्लीम ट्रीम व्यक्तिमत्व सध्या कौतुकाचा आणि आकर्षणाचा विषय ठरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीतही आपला हा नित्यक्रम त्यांनी सुरूच ठेवला असून, या माध्यमातूनही ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांचा प्रचार करत आहेत.मागील दोन दिवसांपासून परळी शहरातील नागरिकांच्या भेटी-गाठीसाठी जनसंपर्क अभियान राबवणार्‍या मुंडे यांनी शनिवारी सकाळी परळीच्या विश्रामगृहाच्या डोंगर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणार्‍या नागरिकांची साडेसहा वाजता भेट घेतली. स्वतःच्या घरापासून वॉक करतच आणि टॅ्रक सुट मध्ये मिटींगस्थळी पोहचत त्यांनी सकाळी शुध्द हवेत फिरणार्‍या नागरिकांसोबत चर्चा केली.

परळीच्या विविध मुद्यांवर चर्चा करताना भाजपा खासदार, आमदारांचे अपयश तर त्यांनी पटवुन दिले, त्याचबरोबर सत्ता नसली तरी परळी शहरासाठी आपले असलेले विकासाचे व्हिजनही त्यांच्या समोर मांडले. परळीला विकासाची प्रसन्न पहाट पहायची असेल तर लोकसभेच्या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकी नंतर त्यांनी जिजामाता उद्यानात ज्येष्ठ नागरिकांच्या मॉर्निंग वॉक क्लबच्या सदस्यांचीही भेट घेऊन आपले मनोगत व्यक्त केले. बॅटमिंटन असोसिएशनच्या सदस्यांसमवेत राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळील चौकात शहरात प्रसिध्द असणार्‍या माया चहाचा आणि गरमागरम भज्यांचा आस्वाद घेत त्यांनाही सोनवणे यांना विजयी का करायचे हे पटवुन दिले. धनंजय मुंडेंसारखे मोठे नेते अचानक आपल्या समवेत मॉर्निंग वॉकला आले, मनमोकळ्या गप्पा केल्या आणि चहाचा आस्वादही घेतल्यामुळे शहरातील हा वर्ग चांगलाच सुखावल्याचे पहायला मिळाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी अध्यक्ष चंदुलाल बियाणी, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, प्रा.पी.एल. कराड, दिलीप कराड, प्रा.विनोद जगतकर, संजय फड, जयप्रकाश लड्डा, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी, सय्यद सिराज, कमलकिशोर सारडा, सचिन मराठे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleपुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी
Next articleभाजपच्या तिस-या यादीतही घटक पक्षांना स्थान नाही