खुशखबर : अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ

मुंबई नगरी टीम

मुंबई । सामाजिक न्याय विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.ही वाढ येत्या एक जुलैपासून लागू होणार आहे.

या निर्णयामुळे वसतीगृह अधीक्षकांचे मानधन दहा हजार रुपये,स्वयंपाकींचे मानधन आठ हजार रुपये,मदतनीस आणि चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडे सात हजार रुपये होणार आहे. राज्यातील २ हजार ३८८ अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे.सामाजिक न्याय विभागातंर्गत राज्यात सुरु असणाऱ्या २ हजार ३८८ अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या अधिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि चौकीदार अशा एकूण ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यभरातील अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या २ हजार ३८८ अधीक्षकांचे मानधन दहा हजार रुपये, २ हजार ८५८ स्वयंपाकींचे मानधन आठ हजार रुपये, तर ४७० मदतनीसांचे आणि २ हजार ३८८ चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ जुलै पासून करण्यात येणार आहे.

Previous articleशरद पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित आहे ना ? मोदींनी केली प्रकृतीची चौकशी
Next articleएसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार लवकरच होणार;सरकारकडून ६०० कोटींची मदत