शरद पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित आहे ना ? मोदींनी केली प्रकृतीची चौकशी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्याचे केंद्राकडे प्रलंबित असणारे विषय मार्गी लागावेत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.ही बैठक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांची प्रकृती आता कशी आहे,अशी विचारणा अजित पवारांकडे केल्याचे समजते.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित होते.बराच वेळ चाललेल्या या बैठकीपुर्वी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या डाव्या बाजूला बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील हॅास्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती.तसेच पवार यांना दोन वेळा हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली.शरद पवारांची प्रकृती आता कशी आहे, अशी अजित पवारांकडे त्यांनी विचारणा केली. शरद पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित आहे ना ? असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांना विचारला.होय पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित आहे, असे अजित पवार यांनी यावेळी उत्तर दिले.पंतप्रधान मोदी यांनी बैठकीपूर्वीच शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचे सांगण्यात येते.

Previous articleदिलासा : आरोग्य विभागात २२२२ पदे भरण्यास मान्यता
Next articleखुशखबर : अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ