कमी गर्दीमुळे मोदी आणि भाजपच्या पायाखालील वाळु सरकली

कमी गर्दीमुळे मोदी आणि भाजपच्या पायाखालील वाळु सरकली

मुंबई ‌नगरी टीम

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय शरद पवार यांच्या कुटुंबियांची आणि राष्ट्रवादीची काळजी करू नये, काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी काय वक्तव्य केले होते, आणि आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या अवस्थेकडे लक्ष देण्याचा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

वर्धा येथील आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत त्यांनी पवार व कुटुंबियांवर केलेल्या टिकेचा समाचार घेताना कदाचित या सभेतील कमी गर्दीमुळे त्यांचा आणि भाजपाचा माथा भडकला असावा, सभेला मिळालेला अल्प प्रतिसाद म्हणजे भाजपच्या पायाखालील वाळु घसरल्याचे लक्षण आहे. २०१४ साली दिलेल्या आश्‍वासनाची त्यांनी आठवण करावी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहुन कुंभकर्ण कोण स्पष्ट होत आहे, असेही मुंडे म्हणाले.

पवार आणि महागठबंधन मोदी सरकार घालवल्याशिवाय राहणार नाही, हे भाजपच्या व मोदींच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या पोटात पोटशुळ उठल्याचा हल्ला त्यांनी केला.

Previous articleबीड जिल्हा अतिसंवेदनशील जाहीर करा : धनंजय मुंडे
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसने किमान ५ हजार लोकांची गर्दी करून दाखवावी