पालघरमध्ये “सबका साथ सबका विकास”
मुंबई नगरी टीम
तलासरी : पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारार्थ आज तलासरी सुतारपाडा येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांना मोठ्या मताधिक्याने निवडणून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
तलासरी सुतारपाडा येथे आोयजित करण्यात आलेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याला महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्यासह राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा आमदाप पास्कल धनारे यांच्यासह पालघर जिल्ह्यातील भाजपा, शिवसेना, आरपीआय,श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.या मेळाव्याला महायुतीचे उमेगवार राजेंद्र गावीत ,राज्यमंत्री राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा आमदाप पास्कल धनारे, भरत राजपूत, राजेश शहा, श्रीनिवास वनगा यांनी मार्गदर्शन केले.महायुतीचे उमेगवार गावीत यांना सबका साथ सबका विकास या मोदींच्या व महायुतीच्या कार्यपुर्तीसाठी स्थानिक पातळीवर ज्या प्रमाणे कर्तव्य पक्ष निष्ठेने निवडणूक लढविली जाते त्याप्रमाणे निवडून आणण्याचा संकल्प महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी केला.