पालघरमध्ये महायुतीचा पदाधिकारी व कार्यकर्तां मेळावा

पालघरमध्ये महायुतीचा पदाधिकारी व कार्यकर्तां मेळावा

मुंबई नगरी टीम  

पालघर : शिवसेना भाजपा  आरपीआय श्रमजीवी, आगरी सेना  महायुतीचे पालघर लोकसभा उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवार दिनांक ११ एप्रिल रोजी डहाणू विधानसभा क्षेत्रात आमदार पासकल धनारे यांच्या निवासस्थानी , दुपारी पालघर विधानसभा क्षेत्रात सोमवंशी क्षत्रिय हॅाल नवली फाटक तर नालासोपारा विधानसभा क्षेत्रात सायंकाळी शादी डॅाट कॅाम ( तुळिंज  रोड ) नालासोपारा पूर्व येथे मेळावा होणार आहे.शुक्रवार दिनांक १२ रोजी विक्रमगड विधानसभा क्षेत्रात सकाळी ११ वाजता  आमराई रिसॅार्ट या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बोईसर विधानसभा क्षेत्रात सायंकाळी वाय.एम.सी.हॅाल मामिकपूर,नवघर या ठिकाणी मेळावा होणार आहे.शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार रविंद्र फाटक,श्रमजीवीचे विवेक पंडीत, वंसत चव्हाण, आमदार पासकल धनारे, सुरेश जाधव यांच्यासह महायुतीचे आजी माजी नगरसेवक,नगराध्यक्ष ,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आदी मान्यवर या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

Previous articleमनोज कोटक यांनी साधला नागरिकांशी थेट संवाद
Next articleपालघरमध्ये “सबका साथ सबका विकास”