राज्यात युतीला ३४ जागा तर राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलनुसार राज्यात शिवसेना भाजप ३४ जागा जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत युतीला ४१ जागा मिळाल्या होत्या परंतु आजच्या एक्झिट पोलची तुलना केल्यास युतीला ७ जागांवर फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार शिवसेना १७, भाजप १७, काँग्रेस ४, राष्ट्रवादी ९ आणि स्वाभिमानीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होणार आहे त्यावेळेसच हे अंदाज किती खरे आहेत हे स्पष्ट होईल.
सी-व्होटरच्या अंदाजानुसारराज्यात भाजपा शिवसेना महायुतीला ३५ जागा मिळतील तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला १४ जागा मिळतील. एनडीटीव्ही पोलनुसार एनडीटीव्हीच्या पोल ऑफ पोल्सनुसार शिवसेना-भाजपामहायुतीला ३५ तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला १२ जागा आणि इतर १ जागा मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. न्यूज १८च्या सर्वेनुसार राज्यात वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. न्यूज १८च्या सर्वेनुसार राज्यात शिवसेना भाजपला ४२ ते ४५ तर महाआघाडीला ४ ते ६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.एबीपी नेल्सनच्या सर्वेनुसार राज्यात शिवसेना भाजपला ३४ तर महाआघाडीला १४ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार भाजपा १७, शिवसेना १७ काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस ९ असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया टुडे अॅक्सिस सर्वेनुसार राज्यात शिवसेना भाजपला ३८ ते ४२ तर महाआघाडीला ६ ते १० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एक्झिट पोलची आकडेवारी
शिवसेना – १७
भाजप १७
काँग्रेस – ४
राष्ट्रवादी -९
स्वा.शे.सं -१
लोकसभा निवडणूक २०१४ निकाल
शिवसेना – १८
भाजप – २३
काँग्रेस – २
राष्ट्रवादी – ४
स्वाभिमानी शेतकरी संघटना – १