उत्तर पश्चिम मध्ये शिवसेनेचा “आवाज”
मुंबई नगरी टीम
मुंबई : गेल्या वेळच्या मोदी लाटेत मोठ्या मताधिक्याने उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात कॅांग्रेसचे उमेदवार गुरूदास कामत यांना पराभूत करणारे शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यंदा दुस-यांदा या मतदार संघातून विजयी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेत त्यांनी गुरूदास कामत यांना पराभूत केले होते. मात्र कामत यांच्या निधनामुळे या मतदार संघातून संजय निरूपम यांना उमेदवारी देण्यात आली.मनसेने भाजप विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र या ठिकाणी निरूपम यांच्या ऐवजी किर्तीकर हे जवळचे उमेदवार वाटत असल्याने मनसेच्या आवाहनाचा कसलाही फायदा निरूपम यांना होण्याची शक्यता कमी आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार उत्तर पश्चिमचा गड राखण्यात किर्तीकर यशस्वी होतील.
२०१४ निवडणूक निकाल
१ ) गजानन किर्तीकर – शिवसेना -४६४८२०
२ ) गुरूदास कामत – कॅांग्रेस – २८१७९२