सीबीएससी आयसीएसई बोर्डाचे महत्त्व वाढवण्यासाठी दहावीचा निकाल घसरवला
मुंबई नगरी टीम
मुंबई: आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालाची टक्केवारी मागील वर्षाच्या तुलनेत १२.३१ टक्क्यानी घसरली ही चिंतेची बाब आहे. अंतर्गत २० गुण देण्याची पद्धत स्टेट बोर्डाने बंद केल्याने हा निकाल घसरला असून सीबीएससी आणि सीआयएसई बोर्डात अंतर्गत २० गुण देण्याची पद्धत असताना स्टेट बोर्डाने ते बंद करण्याचे कारण काय? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
स्टेट बोर्डाने असे २० गुण कमी केल्याने सीबीएससी आणि सीआयएसईच्या तुलनेत स्टेट बोर्डाचे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी स्पर्धेत कसे टिकतील? असा सवाल उपस्थित करतांनाच मूठभर खाजगी संस्थाचालकांची मक्तेदारी असलेल्या व भरमसाठ फी घेणाऱ्या सीबीएससी आणि सीआयएसई बोर्डाचे महत्त्व वाढवण्याचा शिक्षणमंत्र्यांचा हा डाव तर नाही ना ? असे ट्विट करत मुंडे यांनी या घसरलेल्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.