विखे पाटील  जयदत्त क्षीरसागर अविनाश महातेकरांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार

विखे पाटील  जयदत्त क्षीरसागर अविनाश महातेकरांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या रविवारी होणा-या विस्तारात भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर भाजपाचे आमदार अनिल बोंडे, संजय कुटे, आशिष शेलार  आणि आरपीआयचे अविनाश महातेकर  यांचा समावेश नक्की मानला जात आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा  उद्या ११ वाजता राजभवनातील प्रांगणात  पार पडणार आहे.

गेली अनेक दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा होती मात्र या विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या म्हणजेच रविवारी  होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केली आहे. उद्या होणा-या विस्तारात कॅांग्रेसला सोडचिट्ठी  दिलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,, राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह  अनिल बोंडे संजय कुटे  यांच्यासह आरपीआयचे नेते अविनाश महातेकर  यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.  शपथविधी सोहळा  उद्या ११ वाजता राजभवनातील प्रांगणात होणार आहे. निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा केली.

उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या विस्तारातील संभाव्य मंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत वर्षा निवास्थानी पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना निरोपाचे फोन गेल्याने त्यांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली आहे. त्यामध्ये मोर्शी ( अमरावती ) भाजपचे आमदार डॅा. अनिल बोंडे ,जळगाव जामोदचे ( बुलडाणा )  डॅा.संजय कुटे यांचा समावेश आहे. रामदास आठवले यांच्या आरपीआयला सुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. पक्षाचे नेते अविनाश महातेकर यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश केला जाणार आहे. मात्र शिवसेनेकडून कोणाला संधी दिली जाईल हे अजून निश्चित नाही. शिवसेना नेत्यांची आज बैठक होत असून, या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार असला तरी  जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश नक्की मानला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार उद्या अयोध्येला जाणार असल्यामुळे उद्या होणा-या  शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे अनुपस्थितीत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिल्याचे समजते. या पदासाठी. ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने  ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी लॉबिंग सुरु केली आहे. यापूर्वी झालेल्या विस्तारात शिवसेनेने विधानपरिषदेतील सदस्यांना स्थान दिल्याने निवडून  आलेल्या ग्रामिण भागातील आमदारांमध्ये नाराजी आहे. उद्या होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपद सोडत असल्याने आणखी एखादे मंत्रीपद शिवसेनेला दिले जावू शकते. शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यमंत्रीपदासाठी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर, पंढरपूरचे तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा आहे.

Previous articleराज ठाकरेंच्या सभांचा सकारात्मक परिणाम
Next articleमहाराष्ट्राची सायबर आर्मी तयार करणार