विधानसभेसाठी राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती

मुंबई नगरी टीम

मुंबई  : खासदार वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ सदस्यांची जाहिरनामा समिती स्थापन केली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

जाहिरनामा समितीमध्ये सदस्य म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, अनिल देशमुख, आ. राणा जगजितसिंह पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार आनंद परांजपे, उषाताई दराडे, आमदार विद्या चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. ख्वाजा बेग, जीवन गोरे,आ. प्रकाश गजभिये, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार जयदेव गायकवाड, सारंग पाटील, सुरेश पाटील, शेखर निकम, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, युवती प्रदेशाध्यक्षा  सक्षणा सलगर, विजय कन्हेकर आदी.याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, सुधीर भोंगळे, डॉ. मिलिंद आवाड, तर समन्वयक म्हणून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous articleफेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न
Next articleकार्यकर्त्यांचे प्रेम आणि जनतेचा आशीर्वाद हा मंत्री पदापेक्षा मोठा