तुमच्या हातात घड्याळ की तुतारी ? निलेश लंके म्हणाले…साहेब सांगतील तो आदेश !

मुंबई नगरी टीम

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने ते पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.मात्र त्यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नसल्याने पक्ष प्रवेशाचा संभ्रम आजही कायम आहे.तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी ? असा प्रश्न लंके यांना पत्रकारांनी विचारला असता “साहेब सांगितल तो आदेश”, असे सूचक विधान निलेश लंके यांनी केल्याने ते लवकरच पवार गटात जाहीर प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.त्यातच त्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून दाराआड चर्चा केल्याने ते पवार गटात प्रवेश करून नगर दक्षिणमधून लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे मानले जात होते.मात्र शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत किंवा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कोणतेही भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे संभ्रम आजही कायम आहे. मात्र तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता “साहेब सांगितल तो आदेश”, असे सूचक विधान लंके यांनी केल्याने ते पवार गटात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.माझी विचारधारा आणि पक्ष एकच आहे. माझ्या कार्यालयात आजही शरद पवार यांचा फोटो आहे. आज मी शरद पवार साहेबांच्या मंचावर असताना मी दुसऱ्या मंचावर कसा जाईल ? असेही लंके म्हणाले.यावेळी शरद पवार यांनीही निलेश लंके यांची स्तुती केली.

Previous articleधनंजय मुंडेंमुळे बीडमधून भरघोस मतांनी विजयी होणार