अखेर शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई पदवीधर,कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी होणा-या विधानपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.शिक्षकांना देण्यात आलेल्या उन्हाळी सुट्ट्या तसेच सुट्ट्याचा असणारा हंगाम लक्षात घेवून या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती.त्यानुसार येत्या १० मे रोजी होणा-या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

 

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस,कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे,नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार दराडे भिकाजी तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपील पाटील यांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ रोजी संपत असल्याने मुंबई पदवीधर,कोकण पदवीधर,नाशिक शिक्षक मतदारसंघ तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ मे रोजी जाहीर केला होता. त्यानुसार या ४ मतदार संघासाठी येत्या १० मे रोजी मतदान घेण्यात येणार होते.राज्यातील शाळांना २ मे ते १४ जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.मुंबईतील अशिक्षक तसेच पदवीधर मतदार संघातील अनेक शिक्षक आणि पदवीधर मतदार हे बाहेर गावी गेल्याने या निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी विविध संघटनांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.याची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणूका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous articleतुमच्या हातात घड्याळ की तुतारी ? निलेश लंके म्हणाले…साहेब सांगतील तो आदेश !
Next articleराज्य सरकार आणि पालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा