“नॉटरिचेबल” असलेले अजित पवार नक्की नाराज आहेत की आजारी ? समोर आली खरी माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई । बारामती मतदारसंघातील मतदान पार पडल्यापासून उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीच्या नेत्यांच्या सभांना गैरहजर राहिले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या पट्ट्यात ते गायब झाल्याने अजित पवार पुन्हा नाराज झाले असल्याची चर्चा आहे.मात्र अजित पवार हे नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत तर त्यांना घशाचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे.मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.

शरद पवार यांना आम्हाला बारामतीच्या राजकारणातून संपवायचे आहे, असे वक्तव्य भाजपाचे नेते आणि उच्च व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होते.तसेच बारामतीत नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने चंद्रकांत पाटील यांना बारामतीपासून दूर ठेवण्यात आले होते.बारामती मतदारसंघातील मतदान पार पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही प्रचार सभांना हजेरी लावली नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळीही ते अनुपस्थित होते.सुरुवातीच्या काही सभांना अजित पवार उपस्थित होते.बारामती मतदारसंघाच्या अजित पवार यांनी मुक्काम ठोकल्याने त्यांनी इतर मतदारसंघात प्रचार केला नाही.बुधवारी दिंडोरीत झालेल्या सभेला राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ तर कल्याण मधिल सभेला सुनील तटकरे यांनी हजेरी लावली. बुधवारी मुंबईत पंतप्रधान मोदींचा रोड शो झाला यालाही अजित पवार हजर नव्हते.पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी देखील अजित पवार तिकडे फिरकले नाहीत.त्यामुळे गेले काही दिवस नॉटरिचेबल झालेले अजित पवार पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजित पवार नॉटरिचेबल नाही आणि नाराजही नाहीत.त्यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचा त्रास झाला असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे.मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होतील अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.

Previous article“त्या” गोळ्या कसाबच्या बंदुकीतल्या होत्या का ? उज्ज्वल निकम यांनी खुलासा करण्याची आंबेडकरांची मागणी
Next articleझूठ बोलने वाला आदमी देश तो क्या दुनिया में कोई नहीं हुआ होगा ! आंबेडकरांचा मोदींवर निशाणा