“त्या” गोळ्या कसाबच्या बंदुकीतल्या होत्या का ? उज्ज्वल निकम यांनी खुलासा करण्याची आंबेडकरांची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । हेमंत करकरे, विजय साळसकर अशोक कामटे यांच्यासह पाच पोलीस पोलीस कर्मचारी यांच्या संदर्भातले पुरावे समोर आणू नका अशा कोणी सूचना दिल्या होत्या का ? त्याकाळी उज्ज्वल निकम यांच्यावर कोणत्या धार्मिक संघटनेला किंवा व्यक्तीला वाचवण्यासाठी दबाव असेल.आता निकम हे लोकसभेचे उमेदवार असल्याने त्यांच्यावर कोणताही दबाव नसल्याने त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता का ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर मध्य मुंबईचे भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना केला आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे, विजय साळसकर अशोक कामटे यांचा गोळ्या लागून मृत्यू झाला होता.त्या गोळ्या कोणाच्या होत्या, कसाब किंवा अबु ईस्माईलच्या बंदुकातल्या होत्या का ? यासंदर्भात खुलासा करावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी उज्ज्वल निकम यांना गेल्या पत्रकार परिषदेत केली होती.आज पत्रकार परिषद घेत आंबेडकर यांनी पुन्हा एकदा निकम यांच्यावर निशाणा साधला आहे. सात जणांच्या खून प्रकरणी कसाबला दोषी ठरवण्यात आले होते.यात पोलीस अधिकारीही मारले गेले आहेत. मात्र अंतिम निकालात त्यांची नावे नाहीत.काही अधिकारी यामध्ये होते असे सांगून न्यायालयासमोर ही माहिती का आणली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कसाब आणि इस्माईलने वापरलेल्या बंदुकीतून त्यांनी कुठल्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी दबाव होता का ? असा सवाल आंबेडकरांनी यावेळी उपस्थित केला.

या घटनेवेळी राज्यात आघाडीचे सरकार होते.हेमंत करकरे आणि विजय साळकरा यांच्या कटासंदर्भात का बोलला नाही. हा खटला निकमांनी चालवला मात्र त्यात करकरे, साळसकर आणि कामटे यांच्या संदर्भातले पुरावे समोर येऊ दिले नाही. जयचंद कोण आहे ? याचा उल्लेख निकम यांनी करावा असे सांगून, निकम हे राष्ट्रभक्त पक्षाचे उमेदवार असल्याने त्यांनी त्यासंदर्भात खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी भाजपा विरोधी पक्ष होता, त्यांनी हा मुद्दा काढला उपस्थित केला नसल्याचेही असे आंबेडकरांनी सांगितले. त्याने मुंबईवर हल्ला केला त्यांना यापाठी पाकिस्तान असल्याचे माहिती होते.याचा अर्थ त्याचा पाकिस्तानशी संबंध आहे.तो संबंध भाजप का उलगडत नाही ? असा प्रश्न आंबेडकर यांनी भाजपला विचारला.तुम्ही राष्ट्राशी प्रामाणिक नाही तर आम्ही तुम्हाला का मतदान करावे असे प्रश्न जनतेने उज्ज्वल निकम यांना विचारले पाहिजे असेही आंबेडकर म्हणाले.

Previous articleधर्माच्या आधारावर अर्थसंकल्पाचीही फाळणी करण्याचा काँग्रेसचा डाव
Next article“नॉटरिचेबल” असलेले अजित पवार नक्की नाराज आहेत की आजारी ? समोर आली खरी माहिती