आ. प्रविण दरेकर यांच्या ‘संपर्क अभियाना’चा आजपासून शुभारंभ
मुंबई नगरी टीम
मुंबई- भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रविण दरेकर यांच्या संपर्क अभियानाचा उद्या शनिवारपासून शुभारंभ होत आहे. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २७ मधून या अभियानाला सुरुवात होणार आहे.
येत्या ऑक्टोेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांनी संपर्क अभियान सुरु केले आहे. उद्यापासून पुढील दहा दिवस मागाठाणे विधानसभा क्षेत्रात हे अभियान सुरु राहणार आहे. उद्या शनिवारी सायंकाळी ६ वाजता सोलापूर मित्र मंडळ आणि सायंकाळी ७ वाजता आंबेडकर रोड (बालवाडी) येथून या अभियानाला सुरुवात होणार आहे. आमदार प्रविण दरेकर यांनी आयोजित केलेल्या या संपर्क अभियानात भाजपा सभासद नोंदणी, नवमतदार नोेंदणी व संवाद, केेंद्र व राज्यशासन योजनेच्या लाभाथ्यार्र्ंशी संवाद, नवलाभार्थी नोेंदणी यांसह नागरिकांच्या समस्या निवारण व उपाययोजना यांवर आमदार प्रविण दरेकर जनतेशी संवाद साधणार आहेत. मागाठाणे विधानसभा क्षेत्रात येणार्या ६ प्रभागांतील प्रत्येक प्रभागात चार ते पाच ठिकाणी हे संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. याचा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन मंडल अध्यक्ष मोती देसाई यांनी केले आहे.