काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का :  चार आमदारांचा राजीनामा

काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का :  चार आमदारांचा राजीनामा

मुंबई नगरी टीम

मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीचे जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अकोलेचे आमदार वैभव पिचड, ऐरोलीचे आमदार संदिप नाईक आणि काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे  सुपूर्द केला आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठ्ठा धक्का बसला आहे. जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून राष्ट्रवादी मोठा धक्का दिला आहे.अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड,राष्ट्रवादीचे ऐरोलीचे आमदार संदिप नाईक यांच्यासह काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे  सुपूर्द केला आहे. शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न खुद्द शरद पवारांनी केले होते. मात्र या दोघांमधिल वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा दिला आहे. भोसलेंच्यासोबत बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बॅंकेचे संचालकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी दोनच दिवसापुर्वी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली होती.तसेच अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनीही राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. ऐरोलीचे राष्ट्रवादीचे आमदार संदिप नाईक यांनी आज राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या विद्यमान तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला खिंडार पडले आहे.आज राजीनामा दिलेले चार आमदार यांच्यासह अनेक मोठे नेते उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता गरवारे पॅव्हेलियन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित होणा-या एका कार्यक्रमात भाजपात प्रवेश करणार आहेत.

Previous articleमाजी राज्यपाल राम नाईक यांचा भाजपामध्ये प्रवेश
Next articleधनगर समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय