माजी राज्यपाल राम नाईक यांचा भाजपामध्ये प्रवेश

माजी राज्यपाल राम नाईक यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई नगरी टीम

 मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मंगळवारी मुंबईत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मा. राम नाईक यांचे भाजपामध्ये स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा व अनुभवाचा भाजपाला लाभ होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, प्रदेश माध्यमविभाग प्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते अवधूत वाघ, मुंबई भाजपा सरचिटणीस अमरजीत मिश्रा आणि उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार उपस्थित होते.

 राम नाईक म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदाची आपली मुदत काल संपली व त्यानंतर आज आपण पहिले काम म्हणून भाजपाचे सदस्यत्व स्वीकारत आहोत. राज्यपालपद स्वीकारण्यापूर्वी आपण पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे सुपूर्द केला होता. आपल्याला पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पूर्वीपेक्षा अधिक गतीने पार पाडू.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राम नाईक यांची भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली.

Previous articleजाणून घ्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा कार्यक्रम
Next articleकाँग्रेस राष्ट्रवादीला धक्का :  चार आमदारांचा राजीनामा