काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित उद्या शिवसेनेत प्रवेश करणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपुर्द केला आहे.उद्या बुधवारी त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
काँग्रेसला आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.इगतपुरीच्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. त्यांच्या सेना प्रवेशाचा मुहूर्त आज दुपारी ४ वाजता मातोश्रीवर निश्चित करण्यात आला होता. परंतु आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे आजचा पक्षप्रवेश स्थगित करण्यात आला. आता हा पक्षप्रवेश उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर होणार आहे. आमदार निर्मला गावित यांनी विधानभवनात जाऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपुर्द करत पक्षांतरात कुठलीही अडचण येवू नये याची दक्षता घेतली. यावेळी गावित यांच्या समवेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.