पूर्वी नोकरभरतीच्या जाहिराती यायच्या आता नौकरीतून काढल्याच्या जाहिराती येतायत

पूर्वी नोकरभरतीच्या जाहिराती यायच्या आता नोकरीतून काढल्याच्या जाहिराती येतायत

मुंबई नगरी टीम

अंबाजोगाई : राज्याचे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत खोटं बोलत असतील तर यासारखे मोठे दुर्दैव नाही. रोजगार देण्यात महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे असं तुम्ही सांगत आहात. अहो सुरुवातीला नोकरभरतीच्या जाहिराती येत होत्या आणि आज मंदित नोकरीतून काढल्याच्या येत आहेत. नोकरभरती नाही ही तर ओहोटी असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसुराज्य यात्रेच्या आजच्या सहाव्या दिवसाची पहिली सभा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाली त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद नाही अशी टीका करत आहेत. मुख्यमंत्री महोदय, गंगाखेडच्या आणि आताच्या अंबाजोगाईच्या सभेचे तुमच्या आवडीच्या माध्यमावर, ट्विटरवर काही फोटो टाकले आहेत. निरखून पहा या अफाट महासागराला असे आव्हान मुंडे यांनी दिले.

कलम ३७० रद्द केला त्यावेळी सलग दहा दिवस त्यावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी देश आर्थिक संकटात गेला त्यावर कोण चर्चा करणार? नामवंत कंपन्या बंद होत आहेत. अशा पद्धतीने जर उद्योग बंद होणार असतील तर तुमची आमची प्रॉपर्टी विकली तरी देश सावरणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळे आहोत आपण पदासाठी नाही तर समाजकारणासाठी लढतो. आपल्याला एकत्र येऊन या सरकारचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. त्यामुळे नाव आले किंवा नाही आले, फोटो वर टाकला का खाली टाकला याकडे लक्ष न देता केज मतदारसंघातुन नमिता अक्षय मुंदडा यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Previous articleमुख्यमंत्री महोदय, तुमच्यासाठी हा खास फोटो… उघडा डोळे, बघा नीट
Next articleमहिलांनो, मागणारे हात होऊ नका ; स्वतः सक्षम होऊन कुटूंबाचा आधार बना