पुढच्या वर्षीही गणपती बाप्पांचं वर्षावरच स्वागत करू : मुख्यमंत्री

पुढच्या वर्षीही गणपती बाप्पांचं वर्षावरच स्वागत करू:  मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी श्रीगणेशाचरणी करतानाच, पुढच्या वर्षीसुद्धा वर्षा निवासस्थानी आपण गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जगभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झालेल्या गणेशपर्वानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी श्रीगणेशाचरणी केली.जगभरातील गणेशभक्तांना गणेशपर्वाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री म्हणाले, गणेशउत्सव हा सर्वांसाठी आनंदाचा पर्व आहे. सर्वांना गणरायाचा आशिर्वाद मिळावा. विशेषत: राज्यातील पूरपीडित बांधवांना त्यांच्या जीवनात समाधान मिळावे, अशीही प्रार्थना त्यांनी केली.मुख्यमंत्री फडणवीस हे काही दिवस महाजनादेश यात्रेमुळे राज्याच्या दौ-यावर होते. कालच सोलापूर मध्ये यात्रेच्या दुस-या टप्प्याची सांगता झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या भाषणात फडणवीस हे राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असे संकेत दिले आहेत.गणपतीचा आशिर्वाद कायमच माझ्या पाठीशी आहेत असे सांगून,पुढच्या वर्षीसुद्धा वर्षा निवासस्थानी आपण गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Previous articleधनंजय महाडिक, जयकुमार गोरे यांच्यासह राणा जगजितसिंह पाटलांचा भाजपात प्रवेश
Next articleपिक पाण्याने बळीराजा सुखी समाधानी होवो : पंकजा मुंडे