दोन्ही कॉग्रेसचा संयुक्त जाहिरनामा प्रसिद्ध करणार 

दोन्ही कॉग्रेसचा संयुक्त जाहिरनामा प्रसिद्ध करणार 
मुंबई नगरी टीम
मुंबई : आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज जाहीर करण्यात येणार होता मात्र घटक पक्षांनी जाहीरनामा हा एकत्रितपणे  प्रसिद्ध करण्यात यावा असा आग्रह केल्याने आता कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा संयुक्त जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस १२५ – १२५ जागा लढवणार आहे.अजून काही पक्ष आघाडी सोबत येणार आहे. आघाडीतील घटक पक्षांचे जागा वाटप लवकरच करण्यात येणार आहे असेही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज जाहीर करण्यात येणार होता मात्र घटक पक्षांनी जाहीरनामा हा एकत्रितपणे  प्रसिद्ध करण्यात यावा असा आग्रह केल्याने आता कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा संयुक्त जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याचे मलिक म्हणाले.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल गोरेगाव येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत होते.याबाबत बोलताना मलिक म्हणाले की,  गृहमंत्री शहा यांनी कलम ३७० वरुन जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु केले आहे.काश्मीर मुद्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे अभिनंदन केले. वर्षभरापूर्वी मेहबूबा मुफ्ती सोबत भाजप सरकारमध्ये होते मग  ते कोणत्या देशात असा सवालही मलिक यांनी केला.काश्मीरमध्ये तिरंगा फडकविण्यात आला असल्याचे भाजपकडून सांगण्यात येते परंतु तो पहिल्यापासून फडकत आहे मात्र  दोन झेंडे होते ही वस्तुस्थिती आहे.आरएसएसच्या कार्यालयावर कधी तिरंगा फडकवला गेला नाही. आम्ही आंदोलने केल्यावर फडकवला गेला आहे. याचे उत्तर पहिल्यांदा द्यावे असेही  मलिक म्हणाले.
काश्मीरमध्ये ७० दिवसात एकही गोळी चालवण्यात आली नसल्याचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले मग अद्याप कर्फ्यू का काढण्यात आला नाही असा सवाल  मलिक यांनी केला.
काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. याबद्दल दुमत नाही. तीन प्रकारची जनता काश्मीरमध्ये आहे.मुठभर लोकं पाकिस्तानात जायचं बोलत आहेत परंतु बहुसंख्य लोक भारतात येवू इच्छीत आहेत.३७० कलमाचा निर्णय लोकांना विश्वासात घेवून केला पाहिजे होता परंतु तसं झालं नाही हे पवार यांनी आपल्या भाषणातही सांगितले होते असेही  मलिक म्हणाले.काश्मीर मधिल जमीनी पर्यटनाच्या नावाखाली खरेदी केली जावून त्या  जागा अदानी, अंबानी यांना देण्याचा कट असल्याचा  आरोपही  मलिक यांनी केला.
मेट्रोची कामांना आघाडीच्या काळात मंजुरी देण्यात आली. त्याचं श्रेय आजचे सरकार घेत आहे. सगळ्याच क्षेत्रात हे अपयशी ठरले आहे.आर्थिक मंदी, बेरोजगारी निर्माण झाली आहे त्यावर उपाययोजना सरकारने केलेली नाही असा आरोपही  मलिक यांनी केला.राष्ट्रवादी कमकुवत होत आहे असा आरोपही केला जातोय परंतु शरद पवार यांच्या सभांना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या पाठीशी कार्यकर्ता ताकदीने उभा आहे असे सांगून, राज्यात परिवर्तन हे नक्की होणार आहे असा विश्वासही  मलिक यांनी व्यक्त केला.आमचा राष्ट्रवाद असली आहे आमच्या पक्षाचे नावच राष्ट्रवादी आहे परंतु भाजपाचा राष्ट्रवाद नकली आहे.शाहु, फुले, आंबेडकर विचारांचे राजकारण शरद पवार करतात त्यामुळे त्यांचे राजकारण कधीच संपणार नाही परंतु भाजपाच्या गोळवळकर गुरुजींच्या विचारांचे राजकारण किती काळ टिकेल हे लवकरच कळेल असेही मलिक म्हणाले.
Previous articleभाजपा शिवसेना युतीची घोषणा लवकरच ! 
Next articleतृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल