शरद पवारांवरील कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही

शरद पवारांवरील कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी कसलाही संबंध नाही.ईडी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नसून,ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची कारवाई आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असा सरकारवर आरोप लावणे चूकीचे असल्याचे सांगून विधानसभा निवडणुकीत युती शंभर टक्के जिंकणार असल्याने आम्हाला असले हातखंडे करण्याची गरज नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली गेली आहे. तर या प्रकरणी राज्यात ठिकठिकाणी राज्य सरकारचा निषेध करण्यातल येवून काही ठिकाणी बंद पाळण्यात आल्यानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला या प्रकरणी राज्य सरकारवर खापर फोडले आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारचा या कारवाईशी संबंध नाही. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. त्यानुसार न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या गुन्ह्यामध्ये ७० जणांची नावे आहे. १०० कोटी पेक्षा जास्त रकमेचा जेव्हा कोणताही गुन्हा असेल तेव्हा त्यासंदर्भातली दखल ही ईडीला घ्यावीच लागते. अशा प्रकरणांमध्ये ईडी वेगळा गुन्हा करत नाही. ईडीने केलेल्या या कारवाईशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. राज्य सरकार सूडबुद्धीने वागते आहे, जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली आहे, या प्रकारचे आरोप होत आहेत त्याला काहीही अर्थ नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही असे सांगतानाच  त्यामुळे जाणीवपूर्वक कुणाला गुंतवण्याचा हेतू नाही. येत्या विधानसभा निवडणुकत युती शंभर टक्के जिंकणार आहे. त्यामुळे असे हातखंडे करण्याची गरज नाही असा टोला लगावत सरकारवर असा आरोप लावणे चूकीचे आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Previous articleलोकसभा निवडणुकीनंतर राज्यात तब्बल २१ लाख मतदार वाढले
Next articleपुढचं सरकार युतीचेच ! उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचे युतीचे स्पष्ट संकेत