आयातांना शिवसेना भाजपाची उमेदवारी
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कॅांग्रेस राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात शिवसेना भाजपात इनकमिंग झाले आहे. बहुतेक आयातांना शिवसेना भाजपने पहिल्या यादीत स्थान दिले आहे. भाजपने जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर, संदीप नाईक तर शिवसेनेने अब्दुल सत्तार भास्कर जाधव आदींना उमेदवारी जाहीर केली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना भाजपात दोन्ही कॅांग्रेसच्या आमदारांनी प्रवेश केला आहे. त्या आमदारांना शिवसेना भाजपने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले संदीप नाईक ( ऐरोली), शिवेंद्रराजे भोसले ( सातारा), वैभव पिचड ( अकोले), राणा जगजितसिंग ( तुळजापूर ) तर कॅांग्रेसमधून प्रवेश केलेले कालिदास कोळंबकर ( वडाळा) रवीशेठ पाटील, हर्षवर्धन पाटील ( इंदापूर), जयकुमार गोरे ( माण ), मदन भोसले ( वाई ) आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.कॅांग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले अब्दुल सत्तार ( सिल्लोड), निर्मला गावीत ( इगतपूरी), संग्राम कुपेकर ( चंदगड) आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले भास्कर जाधव यांना गुहागरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.