उमेदवारी जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे “केम छो वरली”

उमेदवारी जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे “केम छो वरली”

मुंबई ‌नगरी टीम

मुंबईः युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल वरळी मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. देशात आणि महाराष्ट्रात मराठी हक्कासाठी लढणारा पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेकडून वरळीत “केम छो वरली” असे लिहिलेले बॅनर झळकले आहेत.या बॅनरवर आदित्य ठाकरे यांची छबी असल्याने विरोधकांना निवडणुकीच्या तोंडावर आयते कोलीत मिळाले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी मतदार संघातून शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणाऱ्या पहिला व्यक्तीचा मान आदित्य ठाकरे यांना मिळाला आहे. शिवसेनेची प्रतिमा मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष अशी आहे.मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून वरळीमध्ये ‘केम छो वरली’ अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीवरून समाज माध्यमात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

वरळीत मराठी मतांसोबतच गुजराती मते मिळवण्यासाठी व गुजराती समाजाला आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली असल्याची चर्चा आहे. वरळी मध्ये गुजराती समाजाची मोठ्या प्रमाणात मते असल्याने आदित्य ठाकरे यांच्याकडून गुजराती मतांसाठी केम छो वरली अशी पोस्टर लावण्यात आल्याची चर्चा आहे.

Previous articleआयातांना शिवसेना भाजपाची उमेदवारी
Next articleकाँग्रेसची दुसरी यादी जाहीर; ५२ उमेदवारांची घोषणा