अरे महाराष्ट्राचा मोर्चा आहे, हिंदीत काय ? मराठी माणसांचा मोर्चा हाय..अजितदादांचा मराठी बाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । महापुरूषांबद्दल केलेली वादग्रस्त विधाने,सीमावाद आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी १७ रोजी मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांना आपला मराठी बाणा दाखवला.

महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित पत्रकारांना आपला मराठी बाणा दाखवला.विरोधी पक्षनेते झाल्यापासून अजितदादा अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत आहेत.कोणत्याही विषयावर ते थेट आक्रमक मते मांडताना बघायला मिळत आहे.त्याचाच प्रत्यय आजच्या पत्रकार परिषदेत सर्वांना आला.सुरूवातीला पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी महाविकास आघाडीची भूमिका सडेतोडपणे मांडली.मराठीतून पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर उपस्थित काही पत्रकारांनी हिंदीत माहिती देण्याची विनंती अजित पवार यांना असता अजित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले.आरे महाराष्ट्राचा मोर्चा आहे…हिंदीत कुठे जाणार…मराठी माणसांचा मोर्चा हाय असे अजितदादांनी यावेळी सुनावले.त्यांनतर वाहिनीच्या प्रतिनिधींशी त्यांनी काही काळ हिंदीत संवाद साधत राज्य सरकारवर निशाणा साधला.मात्र या पत्रकार परिषदेत आक्रमक झालेले अजितदादांचा मराठी बाणा संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाला.

Previous article‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’चा पुरस्कार रद्द का केला…मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टच सांगितले
Next articleबोम्मईंचे ट्विट म्हणजे जखमेवर मीठ,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त होयला हो करून आलेत