अटकेपार झेंडा लावणाऱ्या महाराष्ट्राची  काय अवस्था करुन ठेवलीय

अटकेपार झेंडा लावणाऱ्या महाराष्ट्राची  काय अवस्था करुन ठेवलीय

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या पाच वर्षात राज्यात चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुंबईतील सीएसटी जवळचा पूल पडून अनेक माणसे चिरडून मेली. मात्र त्याचाही कुणाला काहीही फरक पडला नाही. मुंबईतील हिरे आणि इतर अनेक व्यवसाय बुडाले, नोकऱ्यांची वानवा आहे, ही वेळ कशी आली असे सांगतानाच अटकेपार झेंडा लावणाऱ्या महाराष्ट्राची ही काय अवस्था करुन ठेवलीय अशी टीका त्यांनी आज केली .

आज भांडुप मध्ये झालेल्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान केले.आजच्या सभेतही त्यांनी सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडा असे आवाहन केले.गेल्या पाच वर्षात काय आश्वासने दिली होती हे सगळे विसरतात. शेतकरी बांधव आत्महत्या करतो आहे. मात्र याची  पर्वा कोणालाही नाही अशी टीका राज ठाकरे यांनी केली. गेल्या पाच वर्षात चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, मुंबई मध्ये पूल पडून अनेक माणसे मेली. मात्र याचा कुणाला काहीही फरक पडला नाही असाही आरोप त्यांनी आपल्या भाषणात केला. भाजपा आणि शिवसेना यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पाळल नाही. मात्र याचा जनतेला सोयीस्करपणे विसर पडला आहे असेही राज ठाकरे म्हणाले.देशातले उद्योग धंदे बंद होत गेले. मुंबईतला हिरे व्यवसाय बुडाला, सध्या नोकऱ्यांची वानवा आहे, ही वेळ कशी आली, ती कुणी आणली याचा थोडा विचार करा असे सांगतानाच . हा हतबल महाराष्ट्र पाहू शकत नाही असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

Previous articleशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक ही चूकच!
Next articleकर्जत-जामखेडला आलेले बारामतीचे पार्सल घरी पाठवा