आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनु शकतात !
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर येवून ठेपली असतानाच राज्याचे मुख्यमंत्री युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे होतील असे भाकित कॅांग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी वर्तविल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. प्यार,जंग मे सब कुछ जायज है असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मी पुन्हा येणार.. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर केले आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही असतानाच राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा म्हणजेच युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असे भाकित शिवसेनेने नाही तर चक्क कॅांग्रेसने हे भाकित वर्तविले आहे. एका वृ्त्त वाहिनीवरील चर्चेत भाग घेताना कॅांग्रेसचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारे यांनी हे भाकित आज वर्तविले आहे. निकालाच्या आदल्या दिवशी त्यांच्या या भाकितामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.राजकारणात काय काय होऊ शकते? राजकारण हा शक्य अश्यकतेचा खेळ असून, विविध वृत्त वाहिन्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार निकाल लागले आणि शिवसेनेला जर राष्ट्रवादीने पाठींबा दिला व यांना काँग्रेसने बाहेरून पाठींबा दिला तर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात व “मी परत येणार” म्हणून सांगणारे घरी बसू शकतात असा टोला लगावतानाच “प्यार,जंग मे सब कुछ जायज है” असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.