अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कसलाच निर्णय झाला नव्हता
मुंबई नगरी टीम
मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपाच्या झालेल्या चर्चेत अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मिळण्याबाबत शिवसेनेने प्रस्ताव दिला होता.मात्र याबाबत कसलाही निर्णय झाला नसल्याची माहिती आज अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारीक संवाद साधताना दिली.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजपच्या जागावाटपाच्या चर्चेत शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याबाबत कसलाही शब्द दिला नव्हता, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी करतानाच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करणार असल्याची विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली असल्यास त्याची माहिती केवळ त्यांनाच असू शकते असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.आम्ही प्रथम श्रेमीमध्ये पास झालो असून, सरकार स्थापनेसाठी कोणताही बी प्लान ठरवला नाही, प्लॅन ए तयार आहे, तोच यशस्वी ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले सांगितले एकूण १० अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला असून,१५ अपक्ष आमदार भाजपाला पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनामधून भाजपविरोधात केले जाणा-या लिखाणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. सामनामध्ये जे लिहले जात आहे याबाबत आमची नाराजी आहे. आमची युती असल्यान एवढ्या ताकदीने कधी काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात ही लिहून दाखवावे, असा टोला त्यांनी लगावला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेत भर पावसात भाषण केले त्याचा गाजावाजा संपूर्ण राज्यात झाला.याबाबत बोलताना, पावसात भिजावे लागते आणि पावसात भिजल्याने फायदा होतो याबाबत आमचा अनुभव कमी पडला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.
















