वाचा : कोणत्या महानगरपालिकेचे महापौरपद कोणासाठी आरक्षित झाले

वाचा : कोणत्या महानगरपालिकेचे महापौरपद कोणासाठी आरक्षित झाले

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह आठ महानगरपालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महानगरपालिकांचे महापौर, उपमहापौर तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे, कक्ष अधिकारी श्रीमती निकीता पांडे, महानगरपालिकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. महापौर, सहसचिव  जाधव तसेच महानगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. विशेषत: प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडती महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या.

आज काढण्यात आलेल्या आरक्षणनुसार बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह आठ महानगरपालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी आरक्षित झाले आहे. वसई- विरार महानगरपालिका अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), मीरा- भाईंदर  अनुसूचित जाती (सर्वसाधारण), अहमदनगर, परभणी अनुसूचित जाती (महिला), लातूर, धुळे, अमरावती नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण),नांदेड-वाघाळा, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर खुला (सर्वसाधारण), नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर खुला (महिला) वर्गासाठी राखीव झाला आहे.अनुसूचित जमातीचे आरक्षण सोडत काढताना २००७ पासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महानगरपालिकांना सोडतीतून वगळण्यात आले. तसेच इतर संवर्गासाठी आरक्षण सोडत काढताना सध्या त्या संवर्गाचे आरक्षण असलेल्या महापालिकांना वगळण्यात येऊन अन्य महापालिकांतून आरक्षण काढण्यात आले.

Previous articleभाजपा सत्ता स्थापन करणार ; सत्ता संघर्षात नारायण राणेंची उडी
Next articleमंत्र्यांच्या दालनात आवराआवर सुरू