भाजपा सत्ता स्थापन करणार ; सत्ता संघर्षात नारायण राणेंची उडी

भाजपा सत्ता स्थापन करणार ; सत्ता संघर्षात नारायण राणेंची उडी

मुंबई नगरी टीम

मुंबई :  राज्याच्या सत्ता संघर्षात आता भाजपाचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे.राज्यात लवकरात लवकर भाजपा सत्ता स्थापन करणार असून,सत्ता स्थापनेसाठी जे जे काही करता येईल ते मी करणार आहे. असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी आज केले आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्यास भाजपाने असमर्थता दर्शविली असतानाही भाजपाचे राज्यसभा सदस्य आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि चर्चा केली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.राणे यांनी त सत्ता स्थापनेसाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहणार आहे.राज्यात भाजपा लवकरात लवकर सत्ता स्थापन करेन अशी मला  अशा आहे. सत्ता स्थापनेसाठी मला जे जे काही करता येईल ते मी करणार आहे. भाजपाला मी सर्वोतोपरी मदत करणार असून, हे माझे कर्तव्य आहे असे राणे यांनी सांगितले.आजची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊ शकेल असे वाटत नाही, असेही राणेंनी यावेळी सांगितले. तसेच, यावेळी राणे यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडले. ज्यांच्यामुळे विलंब होतोय तेच या आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत असेही त्यांनी सांगितले.

Previous articleराज्याचे राजकारण वेगळ्या दिशेला जात असेल तर विचार केला पाहिजे
Next articleवाचा : कोणत्या महानगरपालिकेचे महापौरपद कोणासाठी आरक्षित झाले