राज्याचे राजकारण वेगळ्या दिशेला जात असेल तर विचार केला पाहिजे

राज्याचे राजकारण वेगळ्या दिशेला जात असेल तर विचार केला पाहिजे

मुंबई नगर टीम

मुंबई :  राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे नवे सत्ता समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्टता हवी होती, तशीच शिवसेनेलाही हवी होती असे सांगून राज्यात  राजकारण जर काही वेगळ्या दिशेला जात असेल तर त्यावर आता विचार केला पाहिजे, आमच्याबद्दल बातम्या चुकीच्या पसवरल्या जात आहेत पण तरीही आम्ही तिघे मिळून मार्ग काढू असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिट्रीट हॅाटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद संपताच मालाडच्या रिट्रीट हॅाटेल मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली. राज्याचे राजकारण जर काही वेगळ्या दिशेला जात असेल तर त्यावर आता विचार केला पाहिजे, आमच्याबद्दल बातम्या चुकीच्या पसवरल्या जाच आहेत पण तरीही आम्ही तिघं मिळून मार्ग काढू असे सांगतानाच आम्ही 30 वर्ष एकत्र असताना वेगळ्या विचार धारेचे पक्ष एकत्र कसे आले असा प्रश्न विचारला जातो मग मेहबुबा मुफ्ती आणि भाजप, नितीश कुमार आणि भाजप, चंद्राबाबू आणि भाजप एकत्र कसे आले असा सवाल त्यांनी केला. काही गोष्टींवर कॉग्रेस, राष्ट्रवादीला स्पष्टता हवी होती तशीच शिवसेनेला सुद्धा स्पष्टता हवी होती. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसुन किमान समान कार्यक्रम ठरवु असेही त्यांनी सांगितले. काल पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संपर्क साधला. आमचा मित्रपक्ष आम्ही भाजपपेक्षा आघाडीशी संपर्कात आहे असे म्हणत होता, त्यांना ते उत्तर होते असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आम्हाला वेळ हवी होती. त्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला, पण राज्यपालांनी 48 तास नाही तर 6 महिने देतो, त्यांचे गणित मला अजून समजलेले नाही.भाजपची वेळ संपण्यापुर्वी आम्हाला त्यांच्या वेळेत वेळ देण्यात आली. त्यांनी आम्हाला दिलेल्या  पत्रात असे म्हटले होते, तुम्ही दावा करू इच्छुत असाल तर आम्हाला 24 तासात आमदारांच्या सहीचे पत्र द्या. त्यासाठी आम्हाला 48 तासांची मुदत हवी होती.पण त्यांच्या सारख्या दयावान राज्यपालांनी 48 तास नाही तर सहा महिने मुदत देतो असे सांगितले अशी टीकाही त्यांनी केली.मुख्यमंत्री पदाबाबत भाजपने ठरवले होते किंवा आमच्यात ठरले होते पण मला खोट ठरवल्यामुळे संताप आला.त्यांनी मला काही लालूच दाखवण्यात आले म्हणुन मी त्यांच्या मागे लागलो असे नाही असे स्पष्ट करून हिंदूत्व आमची विचार धारा आहे पण नुसत वचन द्यायचे आणि ते पाळायचं नाही अशा शब्दात त्यांनी भाजपावर टिकास्त्र सोडले.

Previous articleशिवसेनेशी काही मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेणार
Next articleभाजपा सत्ता स्थापन करणार ; सत्ता संघर्षात नारायण राणेंची उडी