काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट !
मुंबई नगरी टीम
मुंबई :सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसकडून आठ कॅबिनेट तर दोन दोन राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.यापूर्वीच्या शपथविधी सोहळ्यात बाळासाहेब थोरात आणि नितिन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.कालच्या विस्तारानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या शिवतीर्थावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितिन राऊत यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काल सोमवारी झालेल्या विस्तारात अशोक चव्हाण विजय वड्डेटीवार,वर्षा गायकवाड,अमित देशमुख,यशोमती ठाकूर,के.सी.पाडवी,अस्लम शेख,सुनील केदार यांनी कॅबिनेट तर सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि डॉ.विश्वजित कदम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज मंगळवारी या मंत्र्यांनी नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल हे देखील उपस्थित होते.राहुल गांधी यांच्या भेटीनंतर या मंत्र्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.