मुंबई नगरी टीम
मुंबई : जन्मतः हृदयाला छिद्र, त्यात मुलगी झाल्याने जन्मदात्या बापाला ‘नकोशी’.. वय अवघे सव्वा महिना ! ही कहाणी आहे समृद्धी सुप्रिया म्हस्कर ह्या बाळाची.नगरविकास मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे व खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विशेष सहकार्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी स्वतः लक्ष घालून त्या बाळावर शस्त्रक्रिया व सर्व उपचार संपूर्णपणे मोफत करण्यात मदत केली आणि समृद्धीला जीवनदान मिळाले.
जन्मतः हृदयाला छिद्र, त्यात मुलगी झाल्याने जन्मदात्या बापाला ‘नकोशी’.. वय अवघे सव्वा महिना ! ही कहाणी आहे समृद्धी सुप्रिया म्हस्कर ह्या बाळाची. सौ. सुप्रिया बाळासाहेब म्हसकर यांच्या पतीने दुसऱ्यांदाही मुलगी झाली त्यात तिला हृदयविकार म्हणून कायमचे माहेरी धाडले.. माहेरी आई एकटीच..परिस्थिती देखील अत्यंत हलाखीची.. पुढील उपचाराकरिता ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ह्या बाळाला घेऊन गेल्या.. व लाखो रुपयांचा खर्च लागणार असल्याने आता काय करावे असा प्रश्नच त्यांना पडला. तिथे त्यांची भेट शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात रुग्णसेवा करणाऱ्या प्रतिनिधी सोबत झाली.
नगरविकास मंत्री शिवसेना नेते ना.एकनाथ शिंदे व खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विशेष सहकार्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी स्वतः लक्ष घालून त्या बाळावर चालू महिन्यात शस्त्रक्रिया व सर्व उपचार संपूर्णपणे मोफत करण्यासाठी मेहनत घेतली. आज मिठाई आणि आभारपत्र घेऊन सव्वा महिन्याच्या ‘समृद्धी’ला भेटायला घेऊन सुप्रिया म्हसकर व त्यांची आई शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे निवासस्थानी आल्या होत्या. त्या चिमुरडीला हातात घेऊन तिची आस्थेने चौकशी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली.तसेच भविष्यात बाळाच्या पालनपोषण आणि शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी उचलणार असल्याचा शब्द देत भविष्यात कोणतीही मदत लागल्यास आम्हाला आवाज द्या, आम्ही नेहमीच उपलब्ध राहू असे सांगत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्या मायलेकींनाही आश्वस्त केले.