सरकारने हातावर पोट असणाऱ्यांची व्यवस्था करावी : चंद्रकांत पाटील

मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गर्दीची‌ ठिकाणे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.‌मात्र, यामुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या दैनंदिन चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामध्ये शेतकरी, फळ आणि भाजी विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कामगार, माथाडी कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाची राज्य सरकारने तरतूद करावी,असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने गर्दिची ठिकाणे बंद करण्याचे आवाहन केले आहे. त्याला संपूर्ण राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, यामुळे राज्यातील फळभाजी विक्रेते आणि उत्पादक शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे कामगार, माथाडी कामगार, कुक्कुटपालन व्यवसायिक यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या चरितार्थासाठी राज्य सरकारने आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.तसेच,गरीब कुटुंबातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती घेऊन लक्षात राज्य सरकारने रेशनिंगच्या दुकानांमधून सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध करुन देण्याची मागणी पाटील यांनी केली.

Previous articleएमसीएची सीईटी परीक्षा पुढे ढकलली
Next articleआज मध्यरात्रीपासून महानगरातील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने,कार्यालये बंद