लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे:  जयंत पाटील यांची मोदींवर टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई : जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता,देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री आठ वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता अशी टीका  राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्रीपासून २१ दिवसासाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र जनतेला जास्त संभ्रमावस्थेत ठेवले असल्याने जयंत पाटील यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.जीवनावश्यक गोष्टींच्याबाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाली आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही असेही  पाटील यांनी स्पष्ट केले आहे.महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन  सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासनही पाटील यांनी राज्यातील जनतेला दिले आहे.

Previous article“मी..मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतोय” … तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचे ऐका !
Next articleरुग्णांना सेवा नाकारल्यास खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयाचा परवाना रद्द करणार