मुंबई नगरी टीम
मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून,शासकिय कार्यालयात पाच टक्के कर्मचारी उपस्थितीची तर खाजगी कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्यात आली आहे.विविध राज्यातील सध्याची सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचे काम वाहिन्यांचे आणि मुद्रित माध्यमातील पत्रकार करीत असतानाच जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची बाधा एका पत्रकाराला झाल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकाराला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथे माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित पत्रकारांना संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना खबरदारी घेण्याची विनंती केली आहे.या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ऑनलाईन संवाद साधून सुरक्षितता राखावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.